Breaking News

मकरसंक्रांतीनिमित्त सुगडी बनविण्याच्या कामांना वेग

म्हसळा ः प्रतिनिधी

म्हसळ्यात मकरसंक्रांतीसाठी सुगडी बनविण्याचा कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय जोमाने सुरू आहे. श्रीवर्धन-म्हसळा-बोर्लीपंचतन या बहुतांश शहरी व अन्य भागांत लागणारी सुगडी याच परिसरातील कुंभार समाजातील महिलावर्ग बनवून त्याची विक्री करतात. तालुक्यातील म्हसळा, श्रीवर्धन, भट्टीचा माळ, गालसुरे, दिवेआगर, गोंडघर, बोर्लीपंचतन, वांजळे, पाभरे, निगडी व कुडगाव या गावांतील कुंभार समाज सुगडी व अन्य मातीच्या विविध वस्तू बनवितात. म्हसळा कुंभारवाड्यात मातीच्या बहुविध वस्तू बनविणारे संत गोरा कुंभार व उत्कर्ष महिला बचतगट कार्यरत आहेत. वंदना बिरवाडकर, लता

परबळकर, वासंती म्हशीलकर, अनुसुया म्हशीलकर, जयश्री म्हशीलकर या महिलांचा मातीच्या वस्तू बनविण्यात हातखंडा आहे. यामध्ये माठ, चूल, तवा, पणत्या, कुंड्या, दही लावण्यासाठी मडकी, लहान मुलांची खेळणी अशा विविध प्रकारच्या वस्तू कोणत्याही यंत्राचा वापर न करता बनवितात.

मकरसंक्रांतीसाठी महिलावर्गातून सुगड्यांना मोठी मागणी असते. या दिवशी सुवासिनी सुगड्यांचे खण घेऊन पूजाअर्चा करतात. स्त्रिया हरभरे, ऊस, बोरे, तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात, तसेच सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाणदेखील देतात. घरातील नव्याने आलेली सून (पाच सुगडी) देवाला ठेवण्याची प्रथा आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply