गव्हाण : रामप्रहर वृत्त
ह.भ.प. सौ. उषाताई नामदेव घरत यांचे शनिवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. ह.भ.प. उषाताई या अत्यंत श्रद्धाळू होत्या. त्या गावातील सर्वच धार्मिक उत्सवांमध्ये उत्साहात सहभाग होत असत. गावातील भजनी मंडळांमध्येही त्यांचा सहभाग होता. त्यांचा होमविधी सोमवारी (दि. 20) होणार असून, दशक्रिया विधी सोमवारी (दि. 27) श्रीक्षेत्र नाशिक येथे होणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरकार्य बुधवारी (दि. 29) राहत्या घरी कोपर येथे होणार आहे. कै. सौ. उषाताई या पंचायत समिती सदस्या रत्नाप्रभा घरत यांच्या जाऊ होत्या. त्यांच्या जाण्यामुळे समस्त घरत परिवारावर शोककळा पसरली आहे.