पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व टी.एन.घरत कनिष्ठ महाविद्यालयात ग्रॅन्डपॅरेन्ट डे (पितामह दिन) साजरा करण्यात आला. पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी आजी-आजोबांसोबत विद्यालयात हा दिन साजरा केला. यामध्ये आजी-आजोबांसमवेत नातवाच्या वेगवेगळ्या स्पर्धा पहावयास मिळाल्या. दूर गेलेले नाते कसे जोपासावे याचा मोलाचा संदेश यामधून मिळाला. या वेळी आजी नातवांसमवेत अनेक छोट्या स्पर्धा तसेच गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शालेय शिक्षणाबरोबरच वैयक्तिक तसेच कौटुंबिक विकासही महत्त्वाचा आहे, असा मोलाचा सल्ला या वेळी देण्यात आला दिला. कार्यक्रमाच्यावेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले.