रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मंगळवारी (दि.4) आयोजन करण्यात आल होत. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यानी क्षितीज या शिर्षकाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर पारितोषिक वितरण सोहळ्यात इयत्ता बारावीचे गुणवंत विद्यार्थी व प्रज्ञावंत शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रयत शिक्षण संस्थेचे रायगड विभागीय जनसंपर्क प्रमुख बाळासाहेब कारंडे, कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, सीकेटी विद्यालय मराठी विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. टी. गडदे, भाजपचे ओवे शहराध्यक्ष सचिन वास्कर, शरद कुमार, तपासे, खडावकर, देशमुख आदी उपस्थित होते.