Breaking News

उरण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या रवी भोईर यांची बिनविरोध निवड

उरण : वार्ताहर
उरण नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी भाजपचे रवी भोईर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम म्हात्रे तसेच आमदार महेश बालदी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या.
उरण नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर रोजी झाली होती त्यात 21 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागला. त्यात भाजपचे 12 उमेदवार व महाविकास आघाडीचे 9 उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी 1 उमेदवार निवडून आले होते. बुधवारी निवडून आलेल्या नगरसेवकांची सर्व साधारणसभा नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठेवण्यात आली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार होती, परंतु उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने भाजपचे रवी भोईर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.
यानंतर भाजपतर्फे उरण नगर परिषदेपासून मिरवणूक काढण्यात आली होती. पुढे आमदार महेश बालदी यांच्या भाजप संपर्क कार्यलय, स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिर चौक, राजपाल नाका, जरी मरी मंदिर, राघोबा देव मंदिर येथून परत राजपाल नाका, गणपती चौक व पुढे आमदार महेश बालदी कार्यलय येथे सांगता समारोप करण्यात आला.
या मिरवणुकीत आमदार महेश बालदी व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रवी भोईर यांच्यासह गट नेता जयविन कोळी, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेविक सायली म्हात्रे, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, निशा म्हात्रे, उरण तालुका मंडळ अध्यक्ष धनेश गावंड, स्नेहल कासारे, आशा शेलार, प्रीतम म्हात्रे,, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, जान्हवी पंडित, उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, खोपटे माजी सरपंच विशाखा ठाकूर, सुगंधा कोळी, कैलास भोईर, हितेश शाह, मनन पटेल, मकरंद पोतदार, संतोष ओटवकर, सुशांत पाटील, प्रशांत ठाकूर, विशाल पाटेकर, रोहन भोईर, प्रीतम पाटील, योगेश वैंवडे, पुरुशोताम सेवक, अभिषेक जैन, राजेश पाटील, निलेश कदम, दिनेश ठक्कर कुणाल शिसोदिया, हस्तिमल मेहता, देवा घरत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply