पनवेल : शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसणार्या आणि महिलांविरुद्ध वाढते अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या फसव्या कारभाराविरोधात मंगळवारी (दि. 25) भाजपने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे. त्यानुसार पनवेल भाजपच्या वतीनेही तहसील कार्यालयावर सकाळी 10 वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता शेतकर्यांची घोर फसवणूक चालवली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचारही वाढले आहेत. त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे असताना आघाडी सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. या सरकारमध्ये निर्यणक्षमता नसल्याने ठोस उपाययोजना होत नाही. त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारला त्याचा जाब विचारण्यासासाठी भाजपच्या वतीने राज्यातील 400 तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन केले जाणार आहे.
Check Also
एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची
शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper