Breaking News

निर्भयाच्या दोषींना अखेर 20 मार्चला होणार फाशी!; चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढविण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट काढले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि मुकेश या चौघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे.

या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी अद्यापही कायदेशीर पर्याय बाकी असल्याचा दावा केला आहे. दोषींच्या वकिलाने असा दावा केला असला तरी कायदेतज्ज्ञांच्या मते या नव्या तारीख निश्चितीनंतर फाशीपासून वाचण्यासाठी दोषींकडे आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

प्रत्येक गोष्टीला अंत असतो. एक दिवस हे दोषी नक्की फासावर जातील. माझा विजय त्याच दिवशी होईल, ज्या दिवशी या दोषींना फासावर चढवले जाईल.

-आशादेवी, निर्भयाची आई

Check Also

एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची

शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply