Breaking News

डॉ. गिरीश गुणे यांचे कार्य तरुण पिढीसाठी मार्गदर्शक

पनवेल : वार्ताहर

डॉ. गिरीश गुणे यांचे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, ते आमच्यासारख्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन सर्वांनी काम केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे काढले. ते पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. पनवेलमधील सुप्रिसद्ध डॉ. गिरीश गुणे यांना गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने श्री गावदेवी सन्मान पुरस्कार 2020 देऊन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शहरातील गावदेवी मंदिरासमोरील प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, डॉ. राजू बुधकर, गोगटे, युवा नेते पवन सोनी, मठाधिपती सुधाकर भाऊ घरत, मंडळाचे प्रशांत शेट्ये, अवधूत घरत, भोपी यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या वेळी डॉ. गिरीश गुणे यांच्या जीवनावर चित्रफीत दाखविण्यात आली. नवीन पनवेल येथील रणसह्याद्री ढोलताशा पथकाने आपली कला सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply