पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संगीता पाटील, संध्या क्षारबिंद्रे, तनुजा टेंबे, सरचिटणीसपदी दर्शना भोईर, मृणाल खेडकर, चिटणीसपदी जयश्री धापते, कुंदा मेंगडे, कोषाध्यक्षपदी रसिका शेट्टे, तर सदस्य म्हणून वनिता पाटील, आशा म्हसकर, स्मिता मोडक, मनीषा ढुमणे, अनिता शहा, सुरेखा गांधी, नीती तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महिला पदाधिकार्यांचे अभिनंदन होत आहे.