Breaking News

कोरोनाचे अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्‍यांना सहकार्य करावे -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कोरोना विषाणूचे आलेले अरिष्ट टाळण्यासाठी नागरिकांनी शासकीय कर्मचार्र्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

चीनमधून आलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला असून, हा संसर्गजन्य विषाणू आपल्या देशात आणि राज्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतही त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोनाचा विळखा वाढत असल्याने दैनंदिन जीवनात याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणा ज्या उपाययोजना करीत आहेत, त्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत. त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये. बाहेर जास्त रेंगाळू नये. अफवा पसरवू वा त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. सर्वांनी संवेदनशील राहावे, असे परेश ठाकूर यांनी संदेशात म्हटले आहे.

याशिवाय जे कोरोनाग्रस्त झाले आहेत किंवा ज्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे त्यांच्याबद्दल आपण संवेदनशील राहून त्यांना सहकार्य करू या. सरकारी यंत्रणांना सहकार्य करून हे जे अरिष्ट आपल्या सर्वांवर आले आहे ते टळावे यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

एक मुलाखत : यशस्वी माजी विद्यार्थ्याची

शालेय विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीत लोकनेते रामशेठ ठाकूर झाले भावूक पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या …

Leave a Reply