Breaking News

आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यात कारवाई; दोन आरोपी जेरबंद

पनवेल ः वार्ताहर

ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड या ठिकाणी दोन हजार रुपये चलनी दराच्या तब्बल आठ कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ठाणे शहर गुन्हे शाखा-5कडून ही कारवाई करण्यात आली.

ठाणे पश्चिम येथील घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी. बी. रोड या ठिकाणी दोन व्यक्ती इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा छापून विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर गुन्हे शाखा-5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून आरोपी राम हरी शर्मा (वय 52), राजेंद्र रघुनाथ राउत (वय 58) यांना इनोव्हा गाडी (एमएच 04-डीबी 5411)सह शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झाडाझडती घेतली असता दोन हजार रुपये दराच्या 400 बंडल असलेल्या आठ कोटी किमतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा आढळून आल्या. याबाबत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता या बनावट नोटा आरोपींनी मदन चौव्हान याच्या मदतीने पालघर येथील टेक इंडस्ट्रियल इस्टेटमधील गाळ्यात संगणक व प्रिंटरच्या सहाय्याने छापून त्या विक्री करण्याकरिता आले असल्याचे सांगितले.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त जयजीत सिंग, सहआयुक्त दत्तात्रय कराळे, गुन्हे शाखेचे अपर आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त, शोध-1चे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट-5चे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके, निरीक्षक अरुण क्षीरसागर, सहाय्यक निरीक्षक भूषण शिंदे, अविनाश महाजन, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, शशिकांत सालदुर, हवालदार सुनील रावते, रोहिदास रावते, सुनील निकम, संदीप शिंदे, विजय पाटील, अजय फराटे, जगदिश न्हावळदे, शशिकांत नागपुरे, नाईक तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, रघुनाथ गार्डे, कॉन्स्टेबल शंकर परब, यश यादव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply