अलिबाग : जिमाका
कोरोना विषाणूबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
परदेशवारी करून आलेल्या रायगड जिल्ह्यातील एका व्यक्तीला मागील काही दिवसांपासून कोरोनाची लागण झाल्याने त्याच्यावर मुंबई येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या व्यक्तीला सुरुवातीला मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या कोरोनाबाधित व्यक्तीवर डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे बुधवारी (दि. 25) त्याचे सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आले. म्हणून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे, तर एका कोरोनाबाधित व्यक्तीवर कस्तुरबा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात अजूनही उपचार सुरू असून ती व्यक्ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे.
यादरम्यान एक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना विषाणू संसर्गित व्यक्तींची संख्या ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे घरी राहून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Check Also
निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …
RamPrahar – The Panvel Daily Paper