Breaking News

मनसे पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांचे शुक्रवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्त पनवेल येथील तथास्तू हॉलमध्ये सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगडच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शोभसभेला उपस्थित राहून सिलकर यांना श्रद्धांजली वाहिली.

या वेळी भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, विक्रांत पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, मनसेच्या महिला आघाडी सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे प्रदेश उपाध्यक्ष संजय जामदार, जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हा सचिव केसरी पाटील यांच्यासह मान्यवरांनी शीतल सिलकर यांना श्रद्धांजली वाहिली. शीतल सिलकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या परिवारास हे अनपेक्षित दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply