खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञाान महाविद्यालयातील आजीवन आणि विस्तार विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवस (दि. 25) साजरा करण्यात आला. या कार्यक्रम साजरा करण्यासाठी आभासी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी ऑरो विद्यापीठ सुरत (गुजरात) येथील डॉ.सुमेध लोखंडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी प्रस्तावनेत मतदानाचे वैशिष्ट्य पटवून दिले. या वेळी सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या व्याख्यानामध्ये डॉ. सुमेध लोखंडे यांनी लोकशाहीतील मतदाराचे महत्त्व आणि कर्तव्य समजावून दिले. महाविद्यालयाच्या बीएमएस विभागाच्या प्रा. अंकिता जांगिड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. मीनल मांडवे यांनी अतिथीचे स्वागत केले तर प्रा. महेश धायगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्याना मतदान करणे लोकशाहीत गरजेचे आहे हे नमुद केले.संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.