उरण : वार्ताहर – कोरोना संसर्ग पसरू नये त्यासाठी उरण शहरातील मेडिकल दुकानांमध्ये औषधे खरेदी करण्यासठी तसेच विशेष करून मास्क, हॅन्डवॉश, सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी खूपच गर्दी असते. दुकाना समोर चौकोनी आकाराचे मार्किंग केल्या जागेत उभे राहुन रांगेत औषधे खरेदी करावेत दोन नागरिकांमध्ये किमान तीन फुटाचे अंतर ठेवावे अशाप्रकारची जनजागृती करण्यात आली आहे.
काही दुकानांमध्ये औषध खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीस काही दुकानात पहिले मेडिकल मधून सॅनिटायझर हातावर दिले जाते व नंतरच दुकानात प्रवेश दिला जातो असे चित्र उरण शहरात दिसत आहे. याचप्रमाणे सुचनांचे फलक ही लावले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्याही दुकानात काऊंटर ला हात लाऊ नका कृपया दुकानासमोरील चौकोनात उभे राहा अशाप्रकारच्या जनजागृती करणारे फलक लावण्यात आले.