Wednesday , February 8 2023
Breaking News

पनवेल मनपातर्फे आठ झोपडपट्ट्यांत विविध विकासकामांचा प्रारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना होणार्‍या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचे काम करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत मागासवर्गीय कल्याण निधीमधून पनवेल मधील आठ झोपडपट्टी वसाहतींमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.

या कामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी करण्यात आले.

पनवेल महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याण निधीच्या माध्यामतून पनवेलमधील आठ झोपडपट्टी वसाहतींमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. मागासवर्गीय कल्याणनिधीमध्ून होणार्‍या कामांचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, वृषाली वाघमारे, जगदीश घरत, जितेंद्र घरत, मनोहर मुंबईकर, अमरीश मोकल, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, रवी नाईक,

पप्पु साळवी, राहुल वाहुळकर, नंधा टापरे, अशोक आंबेकर, नरीना शेख, विजय इंगोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी या विकास कामांसंदर्भात अधिक माहिती  दिली.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply