Breaking News

खोपोलीमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन

खोपोली ः प्रतिनिधी
आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीतून पूर्णत्वास आलेल्या खोपोलीतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन रविवारी (दि. 12) करण्यात आले.यात नगरपालिका क्षेत्रातील हाळ येथील रस्त्याचे डांबरीकरण, शेडवली येथे सामाजिक सभागृह, चिंचवली येथील गार्डन विकसित करणे व सभागृह निर्मिती, सुभाष नगर येथील गार्डनमध्ये विकास, मूळगांव येथील गार्डनचा विकास, शीळफाटा कब्रस्थान व स्मशानभूमीचा विकास, यशवंत नगर येथील गार्डनचा विकास व सुशोभिकरण, वैभव नगरमध्ये आरसीसी भिंत उभारणी, काटरंग येथे आरसीसी पुलाची निर्मिती, चिन्मयनगरमध्ये रस्ता निर्मिती, काटरंग-वैभव नगरीमधील महालक्ष्मी गार्डन विकसित करणे आदी विकासकामांचा सहभाग होता. या वेळी बोलतांना खोपोली शहराने आपल्याला पाठींबा दिला असल्याने, शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नसून, भविष्यातही शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास येतील असे सांगितले. या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक मोहन औसरमल, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, बाळासाहेबांची शिवसेना खोपोली शहरप्रमुख संदीप पाटील, अन्य पदाधिकारी, उपअभियंता विनय शिपाई, पालिका अभियंता नामदेव लगाडे, प्रशासक व मुख्याधिकारी अनुप दुरे आदींसह नागरिक उपस्थित होते.

 

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply