जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन
अलिबाग ः जिमाका – जिल्ह्यातील सर्व औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कर्तव्यावर हजर व्हावे. सर्व घरमालक व नागरिकांनी औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांना कामावर जाण्यापासून अडवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
औषध निर्माण करणार्या कंपन्या अत्यावश्यक औषधे व वैद्यकीय उपकरणे बनवतात आणि त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे कर्मचार्यांच्या स्वच्छतेची निर्जंतुकीकरणाची आवश्यक ती काळजीही घेतात. त्यामुळे औषध निर्माण करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांनी स्वेच्छेने कंपनीमध्ये कामावर हजर व्हावे व त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही आपल्या आवाहनात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी म्हटले आहे.
मात्र जर औषध निर्माण कंपन्यांचे कर्मचारी स्वेच्छेने कामावर हजर झाले नाहीत किंवा त्यांना कामावर हजर होण्यापासून कोणीही रोखले तर त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper