गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कडाव ः वार्ताहर – लॉकडाऊनच्या संकटात कर्जत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा भाजप चिटणीस रमेश मुंढे यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी आपल्या स्थानिक वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतील 50 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच श्रद्धा पुनर्वसन केंद्रातील 200 मनोरुग्ण व कर्मचार्यांना 400 पुरणपोळ्यांचे वाटप वृशाली रमेश मुंढे यांनी केले. या प्रसंगी कर्जत शहरप्रमुख बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, महिला शहराध्यक्षा सरस्वती चौधरी, माजी नगरसेविका बिनिता घुमरे, संजीव दातार, अरुण तांडेल, किरण घाग, विठोबा कांबरी, ज्ञानेश्वर म्हसे, गितेश कदम, रूपेश कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कर्जतमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला साथ देताना समाजातील कोणत्याही उपेक्षित घटकाची आबाळ होऊ नये याची पुरेपूर दखल घेत कर्जतमधील विविध भागात नित्यनेमाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू ठेवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सामाजिक कार्यात अनेक जण आपले योगदान देत असल्याने सामाजिक कार्याचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असल्याचा पाहावयास मिळत आहे.