Breaking News

अखंडित वीजपुरवठ्यासाठी नगरसेवक संजय भोपी प्रयत्नशील

पनवेल ः प्रतिनिधी

खांदा कॉलनी परिसरात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी महावितरण विभागाचे वाशी मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता श्री. माने, पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता श्री. राठोड आणि कळंबोली उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सूर्यातल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी या समस्येचे लेखी निवेदन दिले असून नेहमीच पनवेलकरांच्या हितासाठी आग्रही असलेले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना याबाबत निवेदन दिले असता त्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन या वेळी दिले. खांदा कॉलनी विभागास वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र फीडर नसल्यामुळे इतर विभागातून वीजपुरवठा केला जात आहे. सदर विभागात काही तांत्रिक बिघाड वा इतर कारणास्तव वीजपुरवठा खंडित केल्यास खांदा कॉलनी विभागाचाही वीजपुरवठा बंद होतो. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने याआधी 2017 साली लेखी निवेदनाद्वारे खांदा कॉलनी विभागासाठी महावितरण विभागाकडून ओएनजीसीवरून स्वतंत्र फीडरची मागणी करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला असता सिमरन मोटर्सजवळील टिंबर मार्ट येथून 33 केव्हीचे दोन व कळंबोली स्टील चेंबर येथून 11 केव्हीचे दोन असे एकूण चार स्वतंत्र फीडर खांदा कॉलनीसाठी मंजूर झाले असून तज्ज्ञांच्या मते यामुळे भविष्यात कमीत कमी 25 ते 30 वर्षे खांदा कॉलनी परिसरास विजेचा तुटवडा भासणार नाही. सदरचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरीता पनवेल महानगरपालिका नगरसेवक आणि प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी महावितरण अधिकार्‍यांना लेखी निवेदन दिले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply