Breaking News

पंतप्रधानांची माजी राष्ट्रपतींसह विरोधकांशी चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोनाविरोधात देशाची लढाई सुरूच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) देशातील माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली.

पंतप्रधान मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचप्रमाणे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या

सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे सुप्रिमो आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांच्याशी कोरोनाबद्दल चर्चा केली.पंतप्रधान 8 एप्रिलला सकाळी 11 वाजता दोन्ही सभागृहांतील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply