उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी औषध फवारणी उपक्रमानंतर येथील वन्यजीव निसर्ग मित्र आंनद मढवी यांच्या पुढाकाराने आणि तरुणांच्या सहकार्याने चिर्ले गावात नाले, गटारे सफाईचे काम हाती घेतले आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी सार्यांनीच एकत्रित येऊन गाव परिसर स्वच्छ करू या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिलीप मढवी यांनी केले आहे. या स्वच्छता उपक्रमात चिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश घरत, समाधान माळी, प्रमोद मढवी, भाजपा अध्यक्ष संतोष मढवी, बंटी शेळके, धर्मेंद्र मढवी, जितू बुवा, गाव तंटामुक्ती अध्यक्ष हिराजी मढवी, भरत घरत, पंकज घरत, कृष्णा पाटील, निळकंठ घरत व निलेश पाटील
आदींनी अधिक मेहनत घेतली.