मुरूड : प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असतानाही मुरूड शहरातील मशिदीत नमाज पडल्याने पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मुरूड पोलिसांना शहरातील दारुस सलाम सामुदायिक नमाज पठण सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक रंगराव पवार यांच्या पथकाने या मशिदीत जाऊन पाहणी केली असता, तिथे पाच लोक नमाज पडत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीतील व्हिडीओ फुटेजसुद्धा पोलिसांना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी एक मौलाना व चार जणांवर भा. द. वि. कलम 188, 269, 270 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (3), 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.