पेण : प्रतिनिधी
पक्षांतर्गत समझोत्यानुसार दीपक गुरव यांनी राजिनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पेण नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदी शुक्रवारी (दि. 6) वैशाली संजय कडू यांची बिनविरोध निवड झाली. पेणच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृहात विषेश सभा घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी वैशाली कडू यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रितम पाटील यांनी जाहीर केली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा वैशाली कडू यांचे नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरूद्ध पाटील, बांधकाम सभापती देवता साकोस्कर, सभापती शहनाज मुजावर, नगरसेविका अश्विनी शहा, नलिनी पवार, तेजस्वीनी नेने, नगरसेवक दीपक गुरव, निवृत्ती पाटील, सुहास पाटील, प्रशांत ओक, राजेश म्हात्रे, दर्शन बाफना, अजय क्षिरसागर अॅड. मंगेश नेने यांनी अभिनंदन केले.