Breaking News

कोतवालवाडी स्थापनादिनी 3000 मास्कची निर्मिती

महिला विकास केंद्राचा उपक्रम

कर्जत ः बातमीदार – देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी नेरळ-ममदापूर भागातील 50 एकर जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मृतींना चालना देण्यासाठी कोतवालवाडी ट्रस्टची स्थापना केली. त्या कोतवालवाडी ट्रस्टचा 10 एप्रिल हा स्थापना दिवस होता आणि या दिवशी तेथील महिला विकास केंद्राने कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेले मास्क तयार केले आहेत.

कोतवालवाडी ट्रस्टमध्ये आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह चालवणे, हातमाग केंद्र चालवणे आणि महिला सबलीकरण करणे हे काम केंद्र करीत आहे. आपल्या संस्थेच्या स्थापना दिवशी या केंद्रातील कर्मयोगी हरिभाऊ भडसावळे महिला विकास केंद्रात शिवणकला प्रशिक्षण घेणार्‍या महिलांनी कापडी मास्क तयार केले आहेत. संस्थेच्या अध्यक्ष अनुसया पादिर आणि विश्वस्त संध्या देवस्थळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महिला विकास केंद्रातील सदस्यांनी

कोरोनावर मात करण्यासाठी 3000 मास्कची निर्मिती संस्थेच्या स्थापना दिवशी करून देशाच्या मदतकार्यात सहभाग नोंदविला आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply