Breaking News

नागोठण्यात आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. आदिवासी बांधवांना सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने पेण-सुधागड मतदारसंघाचे भाजपचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने विभागातील चिकणी आदिवासीवाडी, वासगाव, धनगरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, कातळवाडी, पायरवाडी, एकलघर, भपक्याची वाडी या आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, गहू, गोडेतेल, मीठ, डाळ आदी साहित्याचा समावेश होता. हा उपक्रम माजी जि. प. सदस्य मारुती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या वेळी विविध वाड्यांमधील लिंबाजी पिंगळा, गणपत पिंगळे, कमलाकर बांगरे, पांडुरंग पिंगळा, काशीनाथ शिद, महेश कोकरे, जानू कोकरे, धुळ्या कोकरे, ताया हंबीर, चिमा शिद, मालू शिद, रामा शिद, लक्ष्मण उघडा, काशिनाथ शिद, हरी शिद आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply