Breaking News

रोह्यात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रोहे : प्रतिनिधी – देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली. तरीही रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अवैधरीत्या नागरिकांनी रस्त्यावर उतरवल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 29 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान 514 केसेस दाखल केल्या असून त्या माध्यमातून 1,45,500 रुपयांची दंडवसुली करण्यात आली.

रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  शितोळे, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने  वाहतूक पोलीस हणमंत धायगुडे, जनार्दन चेरकर, मपोना. प्रशिला चव्हाण, पो. कॉ. शिर्के यांनी रोहा शहरात लॉकडाऊनच्या काळात राम मारुती चौक, दमखाडी नाका, रोहा अष्टमी पूल येथे नाकाबंदी केली. या वेळीअवैध वाहनांवर कारवाई करण्यात आली.

परवाना नसणे, गाडीची कागदपत्रे व लॉकडाऊनच्या काळात फिरणे या प्रकरणी अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रोह्यात 13 दिवसांत दुचाकी व चारचाकी वाहने अशा एकूण 514 केसेस दाखल केल्या असून त्या माध्यमातून 1,45,500 रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply