Breaking News

‘रिलायन्सचे कार्य कौतुकास्पद’

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाच्या महामारीने संपूर्ण देश ग्रासला असून लाखो लोकांचा रोजगारच गायब झाल्याने अनेकांची उपासमार होत आहे. अशा वेळी येथील रिलायन्स कंपनीने नागोठणे विभागातील बहुतांशी आदिवासीवाड्या तसेच गावांमध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविल्याने हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी

यांनी काढले. येथील रिलायन्स कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 4 एप्रिलपासून विभागातील गावांत तांदूळ, डाळ, तेल आणि कडधान्य आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याच्या उपक्रमास प्रारंभ केला आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील आंबेघर आणि वेलशेत या आयपीसीएल प्रकल्पग्रस्त गावांतील 380 गरजू कुटुंबांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी कोळी बोलत होते. या वेळी रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, कौशिक चक्रवर्ती, रोहे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, नायब तहसीलदार नीलम ढोरमकर-सूर्यवंशी, सीएसआर विभागाच्या वरदा कुलकर्णी, अमित हर्णे, अरविंद बुरुमकर, सरपंच संतोष कोळी, उपसरपंच सखाराम घासे, ग्रामसेवक किसन अहिरे आदी उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply