Breaking News

भाजप नेते वैकुंठ पाटील यांना जामीन मंजूर

अलिबाग ः प्रतिनिधी
भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह अन्य दोन जणांना अलिबाग सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.
पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह तिघांना पोक्सो गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत अलिबाग सत्र न्यायालयाने तंत्रज्ञान अधिनियमन अंतर्गत तीन महिने कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यावर वैकुंठ पाटील यांनी सोमवारी (दि. 28) अलिबाग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची तत्काळ जामिनावर सुटका करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणाबाबत भाजप नेते वैकुंठ पाटील यांनी अलिबाग न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करीत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply