Breaking News

चिरनेर येथील गावदेवी, बापूजीदेव यात्रा रद्द

उरण : प्रतिनिधी – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा 3 मेपर्यंत लॉकडाऊनचे आवाहन देशवासियांना केले आहे. त्यामुळे राज्यातील यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम शासनाने रद्द केले आहेत.

या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीने तातडीने बैठक घेऊन कोरोनाच्या संकटात नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी येथील गावदेवी, रांजण निवासी बापूजी देव व दंडावरच्या बापूजी देवाची यात्रा रद्द करण्याचा महत्वपुर्ण निर्णय एकमताने घेतला आहे. गुरुवारी (दि. 16) चिरनेर, मोठेभोम व धाकटेभोम या चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या.

या शिवाय कोणत्याही प्रकारच्या देवकाठ्या किंवा मिठाईची दुकाने, खेळणी बाजार किंवा अन्य प्रसाधने विक्री करण्यास मनाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मोजक्या चार ते पाच ग्रामस्थांच्या उपस्थित देवाची पूजा व धार्मिक विधी आटोपण्यात आला. पूजेची औपचारिकता मोजक्या वेळेत झाल्यावर संबंधित मंदिरात कोणालाही प्रवेश न देता बंद ठेवण्याच्या सूचना पुजार्‍यांना देण्यात आल्या होत्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply