श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यात कोरोना विषाणूने शिरकाव केला असुन भोस्ते येथील एक रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असुन त्या रुग्णाला पनवेल येथे पाठवण्यात आले आहेत. तर त्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 27 रुग्णांना कोरोनाची चाचणी पडताळणीसाठी श्रीवर्धनमधून पनवेल या ठिकाणी नेण्यात आलेचे समजते.
ह्याच महिन्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील एक व्यक्ती कत्तर येथून आला तो पनवेल, कळंबोली या ठिकाणी त्यांच्या बहिणकडे उतरले होते. त्या नंतर बोर्ली व श्रीवर्धन त्यांच्या निवासस्थानी आले. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला दम्याचा त्रास जाणवू लागला तो दवाखान्यात तपासणीसाठी गेला. त्याला प्राथमिक काही लक्षणे आढळून आल्यास श्रीवर्धन प्रशासकीय अधिकारी वर्गाने त्यांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या सात रुग्णांना श्रीवर्धन येथून पनवेल या ठिकाणी योग्य प्रकारे तपासणी करण्यासाठी पनवेल येथेल शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते.
त्या सात रुग्णांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली त्या वेळी मात्र श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला दिलास मिळाला परंतु रिपोर्ट येईपर्यंत श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये खुप भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु त्या गोष्टीला बोटांवर मोजता येईल एवढ्या दिवसामध्ये दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या गावात वरळी येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण होउन त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता मात्र श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण
निर्माण झाले आहे.
ह्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या श्रीवर्धन मधील 27 व्यक्तींना कोरोनाची चाचणी घेण्यासाठी पनवेल येथील ग्रामविकास भवन या ठिकाणी पाठवण्यात आले असुन त्यामध्ये 20 पुरुष व सात महिलांचा समावेश असल्याचे समजते. या मध्ये एक डॉक्टर, पॅथोलॉजची लॅबचे कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर, मित्र आणि नातेवाईक, यांचा त्यांच्यावर संपर्क असल्याचा समजते.
श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यामध्ये लॉगडाउनच्या काळावधी लपुन छपून काही व्यक्ती मुंबईमधुन श्रीवर्धन तालुक्यात आले असुन प्रशासनाने आता त्यांचा सुध्दा शोध घेऊन त्यांची पण चाचणी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.
श्रीवर्धन भोस्ते गाव हे पुर्ण सील केले असुन त्या गावा परिसरातील तीन किलो मीटरवर पुर्णपणे बंद करण्यात आले असुन पाच किलो मिटर अंतरा पर्यत श्रीवर्धन पोलीसठाणे यांनी सतर्क पहारा ठेवण्यात आले आहे. श्रीवर्धन मधील 27 व्यक्तीची तपासणी करण्यासाठी पनवेल येथील ग्रामविकास भवन या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये 20 पुरुष व सात महिलांचा समावेश श्रीवर्धन तालुक्यात सुमारे 7 ते 8 हजार व्यक्तीना होमकॉरटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. संपुर्ण भोस्ते गाव व परिसर फवारणी मारून निरजंतुकिकरण करण्यात आले.
– अमित शेडगे, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी