पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या विविध पदांवरील नियुक्त्या नुकत्याच करण्यात आल्या आहे. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 22) प्रदान करण्यात आले.
या वेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या.
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या पनवेल विधानसभा प्रभारीपदी मन्सूर पटेल,उरण विधानसभा प्रभारीपदी अॅड. इर्शाद शेख, पेण विधानसभा प्रभारीपदी मेहबूब हसन सय्यद, अलिबाग विधानसभा प्रभारीपदी इब्राहिम खान, श्रीवर्धन विधानसभा प्रभारीपदी कमरुद्दीन मांडलेकर, महाड विधानसभा प्रभारीपदी आदम डावरे, कर्जत विधानसभा प्रभारीपदी रईस बुबेरे, तसेच पनवेल शहर अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी निसार सिराज सैय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मुकिद काझी, पनवेल शहर अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष इम्तियाज बेग, नासीर शेख, मोशिन करनालकर, रय्यान तुंगेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.