Breaking News

रेवदंड्यात रेशनिंग धान्याचे मोफत वाटप

रेवदंडा : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्याना प्रति माह पाच किलो तांदुळ मोफत देण्याबाबत 30 मार्चला आदेश दिले आहेत. या योजनेअंतर्गत रेवदंड्यातील लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत मोफत रेशनिंग धान्य वाटपास जोरदार सुरूवात झाली असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्यांना मोफत पाच किलो तांदुळ वाटपास सुरूवात करण्यात आली. या वेळी रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा चुनेकर व सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी, चेअरमन विनोद रघुनाथ नाईक, व्हाईस चेअरमन विकास महादेव घरत, सदस्य सलिमभाई अब्बास तांडेल, सेके्रटरी रमाकांत एकनाथ घोसाळकर, व सेल्समने संतोष गणपत भगत, सुभाष नथुराम नाईक आदी उपस्थित होती.

रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच मनिषा चुनेकर व सामाजिक कार्यकर्ते शरद गोंधळी यांच्या हस्ते प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील पात्र लाभार्थ्यांना तांदुळ वाटप करण्यात आले. या वेळी लोकसेवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य सलिम तांडेल यांनी विशेष सहकार्य दिले असून त्यांचे मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना मोफत धान्य वाटप लोकसेवा वि.का.सेवा सह.सोसायटीच्या मार्फत केले जात आहे. शिवाय कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर हे धान्य वाटपास सर्वसामान्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवले असून सर्वानी सोशल डिस्टन्सिंगनेच धान्य घेण्यास यावे, असा आग्रह सदस्य सलिम तांडेल यांनी सर्वसामान्य लाभार्थींना केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply