Breaking News

आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

करण्यात आले. रविवार (दि. 26) पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्यासह उद्योजक संजय काठावले, दिपक जुमारे, भगवान पाटील, संतोष भोईर, अनिल पाटील, बाळाराम पाटील आदींसह इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या आदिवासी बांधवांना शासनामार्फत रेशनिंगचे धान्य मिळून देण्यासाठी पनवेल तहसिल कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सांगितले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply