Breaking News

आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तळागाळातील लोकांसाठी कार्यरत असणारे रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्यातील तसेच महाड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

करण्यात आले.रविवार (दि. 26) पनवेल तालुक्यातील कसळखंड येथील दुर्गम अशा आदिवासी वाड्यांवरील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांच्यासह उद्योजक संजय काठावले, दिपक जुमारे, भगवान पाटील, संतोष भोईर, अनिल पाटील, बाळाराम पाटील आदींसह इतर कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. या आदिवासी बांधवांना शासनामार्फत रेशनिंगचे धान्य मिळून देण्यासाठी पनवेल तहसिल कार्यालयात पाठपुरावा करणार असल्याचे या वेळी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सांगितले.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply