पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीमधील भिंगारी कांदेवाडी परिसरामधील पाण्याची पाइपलाइन काही ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीटंचाईच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे. माजी उपमहापौर व नगरसेवक चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा आणि तेजस कांडपिळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. नगरसेवकांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले असून, पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे.