Breaking News

वरसईत 150 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप

पेण : प्रतिनिधी

जगभर थैमान घातलेला कोरोना नावाचा भयंकर मोठे संकट त्यात शेत मजूर, कामगार यांचा हातचा रोजगार गेला. त्यामुळे उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सामाजिक बांधीलकी जपणारे पेणचे कर्तबगार, कर्तव्यदक्ष अधिकारी संजय घोडजकर यांनी स्वत:च्या वेतनातून मौजे वरसई येथे दिडशे गरजू कुटुंबांना तांदूळ, तेल, डाळ, साखर, चहापावडर, मीठ, मिरची असे अन्नधान्य वाटप करुन समाजात एक नवी ओळख निर्माण केली आहे.

 दरवर्षी गणेश विसर्जनाचे वेळी पोलीस कर्तव्य बजावणार्‍यांस  जेवण, स्वच्छता अभियान असे, अनेक उपक्रम राबवून पेणकरांची मने जिंकली आहेत. वरसई येथील दिडशे कुटुंबास आपले वेतनातून अन्नधान्य वाटप केल्याने त्यांचे अनेकांनी कौतुक केले. या वेळी शेंडेकर परिवारानी वाटपाचे वेळी मदत केल्याचे समजते. अन्नदान करताना कुठल्याच बडेजावपणा किंवा चमकोगिरी केल्याचे दिसले नाही.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply