Breaking News

कळंबोलीत चारचाकी गाडीची चोरी

पनवेल : बातमीदार

कळंबोली येथील भाऊ जगन्नाथ म्हारनूर (वय 26) यांची 70 हजार रुपये किमतीची मारुती इको कार 8 मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कळंबोली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊ जगन्नाथ म्हारनूर यांनी आपली मारुती इको कार क्र. (एमएच 03 बीएच 7809) ही सेक्टर 2 ई येथील पाण्याच्या टाकीसमोर मोकळ्या जागेत पार्क करून ठेवली होती, मात्र त्यांना पार्क केलेल्या जागी गाडी दिसून आली नाही म्हणून कळंबोली परिसरात, तसेच कामोठे, खांदेश्वर, पनवेल परिसरात गाडीचा शोध घेतला, मात्र गाडी मिळून आली नाही. त्यामुळे तिची चोरी केली असल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply