नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जागतिक डायबिटीज डेच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनच्या वतीने शनिवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 वाजता येथील फ्लाइट लेफ्टनंट तुषार चव्हाण गार्डनमध्ये डायबिटीज डे साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला पनवेलच्या प्रसिद्ध डायबिटीज स्पेशालिस्ट डॉ. किर्ती समुद्रा यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुमूल्य व सखोल असे मार्गदर्शन व उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
या वेळी मे. बायोकॉन बायोलॉजीक्सच्या वतीने सर्व उपस्थीतांना डायबिटीज अवेअरनेससाठी टी शर्ट व कॅपचे वाटप करण्यात आले. तसेच या वेळी मॅनकाईड फार्माच्या वतीने उपस्थित नागरिकांची ब्लड शुगर टेस्ट विनामुल्य करण्यात आली. बायोकॉन बायोलॉजीक्सच्या वतीने अक्षय गोळे व मॅनकाईड फार्माच्या वतीने निखील तेंडुलकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कामोठेचे माजी अध्यक्ष शशिकांत म्हात्रे, रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सेक्रेटरी विनोद गुरमे, व्ही. सी. म्हात्रे, बालाजी घुमे, प्रकाश पाटील, किसन पवार, संजय जैन व प्रिती गुरमे उपस्थित होते.
व्ही. सी. म्हात्रे यांनी पाहुण्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले, तर उपस्थितांचे आभार विनोद गुरुमे यांनी मानले.