उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे 21 जणांना लागण झाल्याचे ताजे असतानाच त्यांच्या संपर्कातील आणखी 27 जणांना संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. 11) समोर आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नव्या रुग्णांमुळे करंजातील कोरोनाबाधितांची संख्या 48, तर तालुक्यातील आकडा 56वर पोहोचला आहे.
करंजा येथील कोरोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातून प्रादुर्भाव झालेल्या 21 व्यक्तींना क्वांरटाइन करण्यात आले आहे. त्यानंतर नवे 27 रुग्ण समोर आले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित 56 रुग्णांपैकी पाच जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सध्या उर्वरित 51 रुग्णांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Check Also
रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष
रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper