होमिओपॅथिक गोळ्या आणि फळांचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे कार्यकर्ते रितेश बाबर यांच्या वतीने मंगळवारी (दि. 2) खांदा कॉलनी परिसरात नागरिक, सुरक्षारक्षक, सफाई कामगार, रिक्षाचालक-मालक संघटना, पेपरविक्रेते आदींना

अर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर

यांच्या प्रेरणेतून हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या वर्षी कोरोनाची महामारी ओढवली आहे. त्यामुळे आरोग्यदायी कार्यक्रमांतर्गत वाकडी येथील अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेकुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी 80 ते 100 कुष्ठरुग्णांना फळे वाटप करण्यात आली. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर कानडे, युवा कार्यकर्ते रमेश शिंदे, नागेश गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply