Sunday , October 1 2023
Breaking News

सैनिकांसाठी देणगीच्या अटीवर आरोपींना जामीन

तेलंगणा ः वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये 40 हून अधिक सीआरपीएफचे सैनिक शहीद झाले. या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देशातील नागरिकांबरोबरच परदेशामधील भारतीयही मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी आपल्या परीने शक्य असेच तशी मदत सैनिक वेल्फेअर फंडला करताना दिसत आहेत. अशातच तेलंगणा उच्च न्यायलयाने फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला एक लाख रुपये सैनिक कल्याण निधीला दान करण्याच्या अटीवर जमीन मंजूर केला आहे. तेलंगणा उच्च न्यायलयातील न्यायधीश बी. शिवशंकरा राव यांनी हा आगळावेगळा निर्णय दिला आहे. सन परिवार ग्रुपच्या अधिकार्‍यांविरुद्ध एका फसवणुकीच्या खटल्यात त्यांनी हा निर्णय दिला. सैनिक कल्याण निधीला एक लाख रुपये देणगी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात आरोपी असणारे सन परिवार ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेथूकू रवींद्र आणि त्यांच्या साथीदारांना डिसेंबर महिन्यात पोलिसांनी अटक केली होती. अखेर रविंद्रसहीत त्यांच्या साथीदारांना सैनिक कल्याण निधीला देणगी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाला आहे. दर महिन्याला पैसे देण्याचे आश्वासन देऊन या कंपनीच्या अधिकार्‍यांनी कंपनीच्या 14 हजार गुंतवणूकदरांची 150 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप या सर्वांवर आहे.

याआधीही न्यायलयाने वेगवेगळ्या कारणांसाठी देणगी देण्याच्या अटीवर आरोपींना जामीन मंजूर करण्याचे प्रकार घडले आहेत, मात्र सैनिकांसाठी देणगी देण्याची अट अशाप्रकारे पहिल्यांदाच दिली आहे. मागील वर्षी केरळमध्ये पूर आला होता त्यावेळी गुजरामधील अहमदाबाद आणि वडोदरा येथील न्यायालयातील न्यायाधीशांनी आरोपींना 26 हजार रुपये पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देण्याचे आदेश दिले होते.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply