पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या परिसरातील ठिकाणांची पाहणी केली व आढावा घेतला.
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड जिल्ह्यात धडक दिली. या वादळामुळे पनवेलमध्येही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तेथील रस्ते बंद झाले होते, तर विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 19मध्ये अधिकार्यांसह पाहणी करून आढवा घेतला.
या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, एमएससीबीचे अधिकारी श्री. मोरे, प्रभाग क्रमांक 19अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, केदार भगत, चिन्मय समेळ, हरिश्चंद्र भगत, तुषार कर्पे, अजिंक्य जाधव उपस्थित होते.
Check Also
कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …
RamPrahar – The Panvel Daily Paper