मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या हाहाकारानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अखेर मुंबईत सर्वसामान्यांसाठी बेस्ट बसेस सुरू होणार आहेत. रविवारपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसेस धावणार असून या बसेसमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसह सरकारने परवानगी दिलेले इतर नागरिक प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे मुंबईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.
राज्य तसेच केंद्र सरकारने पुनश्च हरिओमची घोषणा करीत राज्यातील अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलॉक प्रक्रियेचा रविवारी तिसरा टप्पा असून या टप्प्यात अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत बेस्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या नियमावलीनुसार बेस्ट बसमधून एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे एका बसमधून फक्त 30 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यापूर्वी बेस्ट बसमधून उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती, मात्र सोमवारपासून पाच प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे बंधन पाळणे आणि तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा 3 …