पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 6) कोरोनाचे तब्बल 82 नवे रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 56, पनवेल ग्रामीणमधील नऊ, पेण तालुक्यातील आठ, उरण तालुक्यातील चार, कर्जत व तळा तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि खालापूर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पनवेल महापालिका हद्दीत तिघांचा आणि तळा येथे एकाचा बळी गेला आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1386 वर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्या 60 झाली आहे.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा 3 …