Breaking News

कोरोनाबाधितांचा अधिवास विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल ः बातमीदार

पनवेल तालुक्यातील विचुंबे, उसर्ली खुर्द, मौजे वावंजे, सुकापूर आणि उलवे येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. 

विचुंबे, येथील कोरोना रुग्ण राहत असलेली ओमकार पार्क-1 बिल्डिंग, उसर्ली खुर्द येथील निळकंठ फेज-1 बिल्डिंग, ओ विंग इमारत, मौजे वावंजे येथील संदीप बाळाराम पाटील यांचे घर, पूर्वेस अनिस युसूफ शेख, प्रकाश शंकर सुतार यांचे घर, दक्षिणेस ओसाड जमीन नाला, उत्तरेस सार्वजनिक तलाव परिसर, सुकापूर येथील साई इन्क्लेव्ह बिल्डिंग, ई विंग आणि उलवे येथील तुलसी आंगन बिल्डिंग, फ्लॉट नं. 15, सेक्टर-6 ही संपूर्ण इमारत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहे.या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply