Breaking News

नौदलाच्या पाणबुडीचे वॉल्व्ह चोरीला; गुन्हा दाखल

खोपोली ः प्रतिनिधी

खालापुरातील एका कारखान्यातून सुमारे 80 लाखांचे वॉल्व्ह चोरीला गेल्याची घटना घडली. चोरी झालेल्या वॉल्व्हचा वापर नौदलाच्या पाणबुडीकरिता होत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

फिर्यादी पंडिता राध्या हिरेमठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंभिवली गावाच्या हद्दीत असलेल्या सीएफएफ फल्युईड कंट्रोल प्रा. लिमिटेड कारखान्यात मरीन रूममध्ये उघड्या दरवाज्यावाटे चोरट्याने प्रवेश करून भारतीय नौदलाच्या मालकीचे पाणबुडीकरिता वापरले जाणारे दोन ब्लोविग वॉल्व्ह बॉडी पार्ट चोरून नेले आहेत.ही घटना मार्च ते जून या कालावधीत घडल्याची शक्यता फिर्यादी हिरेमठ यांनी वर्तविली. दोन दिवसांपूर्वी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि कलम 380प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply