Breaking News

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज सुरू

पेण ः प्रतिनिधी

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन व लायसन्सविषयक सर्व कामे सुरू करण्यात आली आहेत. नेमून दिलेल्या कोट्याप्रमाणे अपॉइंटमेंट घेतली असेल व त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे कार्यालयात सादर केल्यानंतर कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिवहन कार्यालयातील गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनमुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन व लायसन्सविषयक कामकाज स्थगित करण्यात आले होते. आता परिवहन कार्यालयात 18 मेपासून नवीन नोंदणीविषयक, तर 1 जूनपासून परिवहन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणे व नूतनीकरणाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच 18 जूनपासून शिबिर कार्यालयातील कामे वगळता उर्वरित सर्व कामे जसे अनुज्ञप्ती जारी करणे, दुय्यम अनुज्ञप्ती देणे, अनुज्ञप्ती नूतनीकरण, पत्ता बदल, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, वाहनविषयक, परवानाविषयक सर्व कामे व वायुवेग पथक कामकाज सुरू करण्यात

आले आहे.

या सर्व कामकाजाकरिता आगाऊ वेळ निर्धारण प्रणालीवर निर्धारित करणे आवश्यक राहील. शिकाऊ अनुज्ञप्ती व ड्रायव्हिंग टेस्टसाठी येणार्‍या अर्जदारांनी मास्क व हॅण्ड ग्लोव्हज घातले असतील तरच कार्यालयात प्रवेश देण्यात येईल. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणार्‍या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले असेल तरच योग्यता प्रमाणपत्रविषयक चाचणी घेण्यात येईल, असे कळविण्यात

आले आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply