Breaking News

सावरसई येथील कोविड केअर सेंटरची आ. रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी

पेण : प्रतिनिधी – पेणमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या वतीने सावरसई आश्रमशाळा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सावरसई येथे जाऊन कोविड सेंटरची पाहणी केली.

पेण तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या रुग्णांना पुढील उपचारासाठी अलिबाग, पनवेल मुंबई याठिकाणी न्यावे लागत असून कोरोना पॉझिटिव्ह पण कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत अशा व्यक्तींसाठी पेणमधील सावरसई येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली. या सेंटरमधील सोयीसुविधांची आमदार रवीशेठ पाटील यांनी पाहणी करून अधिकार्‍यांना सूचना दिल्या यावेळी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा म्हात्रे, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, तसेच तलाठी, सर्कल व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply