उरण : प्रतिनिधी
कराटे म्हणजे केवळ स्वसंरक्षण न राहता जागतिक स्तरावर या खेळाचे महत्त्व वाढले आहे. विद्यार्थी वर्ग या खेळात शालेय ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवून उज्ज्वल यश मिळवू शकतो. अशा सुयश प्राप्त खेळाडूंचा सत्कार गोशीन रियु कराटे वेल्फेअरच्या वतीने पाणदिवे येथील पी. आर. पी. स्कूलमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब रानसईचे अध्यक्ष राजू मुंबईकर, सारडे विकास मंचचे नागेंद्र म्हात्रे, सुयश क्लासचे निवास गावंड, समीर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी पालकांशी सुसंवाद साधण्यात आला आणि कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सिहान राजू कोळी यांचा गोशीन रियु कराटे फेडरेशन इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
विनय पाटील यांची गोशीन रियु कराटे फेडरेशन इंडियाच्या सहसचिवपदी निवड झाली. एक्झेटीव्ही बॉडीवर गोपाळ म्हात्रे व संतोष मोकल यांची निवड झाली. मुकेश सिन्हा रोहा तालुकापदी, तसेच महाराष्ट्र गोशीन रियु कराटे बॉडीवर कृष्णा पाटील व आनंद खारकर उपाध्यक्ष, सुलभ कोळी सदस्य झाले.
या कार्यक्रमास कणकेश गावंड, परेश पावसकर, सुनील ठाकूर, कमलाकर म्हात्रे, राजेश कोळी, अविनाश गावंड, राकेश म्हात्रे, प्रीतम मोकल, धनेश कोळी, अमिता घरत, आमिषा घरत, मानसी ठाकूर, विनया पाटील, शुभम ठाकूर आदी उपस्थित होते.